Tuesday 3 November 2015

पश्चातापाची भावना व्यक्तीला नात्यांच्या अधिक जवळ आणते.. पण ही भावना बोलून दाखवणं शक्य नसते तेव्हा भावनेला शब्दांची जोड मिळते..आणि कागदावर उमटू लागतात हे पश्चातापाचे शब्द..


आज माझ्या रागाने माझ्यावर मात केली होती
जिंकायचच ठरवून त्याने माझ्यातली मीच संपवली होती..

स्पर्धेत उतरून आवरायला हवं होतं मी रागाला
पण त्याचा ठामपणा निर्ढावलेला..
हा राग काही माघार घेइना
आणि माझं शांत मन काही जागं होईना..

माझी आणि रागाची खेळी रंगली होती
पण खूप प्रयत्न करूनही
आज माझ्या रागाने माझ्यावर मात केली होती...

चूक आता कळते आहे
आणि निघून गेलेली वेळ माझ्यातल्या भावनेला हसते  आहे..

आले होते तुला सुखाचे चार क्षण द्यायला
मात्र या निरोपयोगी रागाने त्यावर कब्जा केलेला..
ते क्षण काही तुला देता आले नाहीत
परत घेऊन आले तुला दुखावण्याची खंत
पण आता जिवाची होणारी ही तगमगच तुझ्यावरच्या प्रेमाची साक्ष आहे

प्रयत्न करेन रागाला जिंकू न देण्याचा
आपल्यातला वाद वेळीच मिटवण्याचा
कारण नात्यातला ओलावा मला जपायचाय
आयुष्यभर तुझ्यावर खूप प्रेम करायचय...